Weather Update Today 5 September 2023 Imd Update Monsoon Possibilities In Various States Heat Waves In Some Part Of India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today: सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) उसंत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे, तर काही राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. IMD च्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत मंगळवारी (5 सप्टेंबर) दिवसा ढगाळ वातावरण असेल आणि रात्री हलका पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील विदर्भात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या पावसानंतर सध्या वातावरण अल्हाददायक आहे. याशिवाय उत्तर भारत, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

नवी दिल्लीत रात्री तुरळक पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच मंगळवारी राजधानी दिल्लीत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि रात्री तुरळक पाऊस पडू शकतो. दिल्लीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमवारी दिल्लीत कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सामान्य तापमानापेक्षा सहा अंशांनी जास्त आहे.

महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाची शक्यता

विदर्भातही दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांत हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भात आजसाठी यलो अलर्ट असणार आहे. तर उद्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट राहणार आहे.

यूपी-उत्तराखंडमध्ये आज कसं असेल हवामान?

उत्तर प्रदेशच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर, तिथे उष्णतेची लाट कायम आहे, परंतु आयएमडीने उत्तर प्रदेशमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. आज पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत तुरळक पाऊस पडू शकतो. तर पूर्व उत्तर प्रदेशातील एक-दोन ठिकाणी हलका पाऊस होऊन तापमान कमी होण्याची शक्यता आहे. यूपीत 5 सप्टेंबरनंतर मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमधील हवामान देखील बदललं आहे. जवळपास आठवडाभरानंतर डेहराडूनमध्ये जोरदार पाऊस झाला आणि मसुरीमध्येही ढग दाटून आले, त्यानंतर लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने बागेश्वर, पिथौरागढ, अल्मोडा आणि चंपावत जिल्ह्यात 6 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय उत्तर भारत, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आजपासून ईशान्य भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यांत पाणी, बारामतीत पावसाने दडी दिल्याने पेरूच्या उत्पादनात घट

[ad_2]