
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, मनसे शहाराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह आदी उपस्थित होते.

नांदगावकर यांनी सांगितले की, ९ मार्च रोजी मनसेचा १९ वा वर्धापनदिन आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्याची संधी पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदाच मिळत आहे. या मेळाव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी व नवीन पदांची निर्मिती करण्यासाठी राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.