
उल्हासनगर :- येथे प्रियदर्शनी एग्रीकल्चर अँड लीगल कन्सल्टन्सी चे सर्वेसर्वा इंजि. अमोल शंकरराव वाघमारे यांना कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि मा. कॅबिनेट मंत्री श्री. सूर्यकांत गवळी साहेब व प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. गजानन भाऊ लिंबोरे यांच्या हस्ते उल्हासनगर येथे प्रदान करण्यात आला.
हा गौरव म्हणजे कृषी उद्योग क्षेत्रात गावागावात उद्योजकता पोहोचावे म्हणून अथक परिश्रम घेणाऱ्या आणि समाजहितासाठी समर्पित असलेल्या उद्योग मार्गदर्शकाच्या कार्याचा सन्मान आहे. कृषी उद्योग मार्गदर्शनातून सातत्याने सामाजिक, आर्थिक मागासलेल्या वर्गातील गरीब शेतकरी उद्योजक यांचा आर्थिक विकास होण्यासाठी आर्थिक शिक्षण आणि उद्योजकता विकास या ध्येयविषयक मार्गाचा सन्मान आहे. कृषिरत्न पुरस्कारामुळे सरांच्या कार्यास नवी उर्जेची आणि प्रेरणेची दिशा मिळाली आहे.
हा कृषिरत्न पुरस्कार आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी कार्य करणाऱ्या कृषी उद्योग मार्गदर्शकास मुंबईमध्ये सन्मानित करण्यात येते. यावरून त्यांच्या कार्याचे स्वरूप किती व्यापक आहे असे गौरौउदगार जिजाई पोल्ट्री फार्म ,व पोल्ट्री खाद्य निर्मिती उदयोजक श्री शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले ..
त्यांना मिळालेल्या या विशेष पुरस्कारा चे सोलापुर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातून कौतुक होत आहे …
