Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

December 10, 2025

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»डॉ. आंबेडकर स्मारकामागील पोलीस स्टेशनचे आरक्षण तत्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन ! – सिमा सावळे यांचा प्रशासनाला इशारा
पिंपरी चिंचवड

डॉ. आंबेडकर स्मारकामागील पोलीस स्टेशनचे आरक्षण तत्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन ! – सिमा सावळे यांचा प्रशासनाला इशारा

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comJune 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि.२१: पिंपरी-चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि समस्त आंबेडकर अनुयायांसाठी श्रध्देचे केंद्रबिंदू ठरलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील ‘भीमसृष्टी मैदान‘ आता धोक्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सुधारित विकास आराखड्यात या मैदानावर चक्क पोलीस स्टेशन, मनपा उपयोग आणि बस टर्मिनसचे आरक्षण टाकले आहे. याठिकाणी आरक्षण टाकून प्रशासनाने शहरातील आंबेडकर अनुयायांच्या भावनांवर क्रूर हल्ला केला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत मनपाच्या या अन्यायकारक कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तर तो विचार, प्रेरणा आणि एकजुटीचा महामेळावा आहे. संपूर्ण शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुका याच भीमसृष्टी मैदानावर एकत्र येतात, जिथे ज्ञानाचा प्रकाश देणारी प्रबोधनात्मक व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी आठवडाभर परिसर भारलेला असतो. हजारो नागरिक, बालकांपासून वृद्धांपर्यंत, मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात. इतर वेळा वर्षभरात याच मैदानावर अनेक सामाजिक, राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जिथे अनेक दिग्गजांनी आपले विचार मांडले आहेत. हे मैदान म्हणजे आंबेडकरी चळवळीची आणि पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक एकोप्याची जिवंत साक्ष आहे. “डॉ. आंबेडकर अनुयायांना या महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरात एकच जागा उपलब्ध होती. सुधारित विकास आराखड्याच्या माध्यमातून ती देखील हिसकावण्याचा हा षडयंत्रपूर्वक डाव आखण्यात आला आहे. विशेषतः या ऐतिहासिक जागेवर मुद्दाम पोलीस स्टेशनचे आरक्षण लादून सर्व आंबेडकरी जनतेचा घोर अपमान करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी जागाच मिळू नये, असा हा नीच कट आहे, असे सिमा सावळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त करत म्हटले आहे, “

प्रशासनाने तत्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील भीमसृष्टी मैदानावर टाकलेली सर्व आरक्षणे रद्द करावीत आणि याठिकाणी ‘भीमसृष्टी मैदान‘ हे आरक्षण प्रस्तावित करावे, अशी मागणी सिमा सावळे यांनी केली आहे. अन्यथा, या अन्यायाविरुद्ध मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंबेडकरी जनता आपला स्वाभिमान आणि आपल्या महामानवाच्या स्मृती जतन करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे, असा निर्धार सावळे यांनी व्यक्त केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रविराज काळे
Next Article चिंचवडच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची “स्वच्छता वारी” ठरली कौतुकास्पद…
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025

पुणे-अबुधाबी विमानसेवेला सुरुवात

December 4, 2025

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

By pragatbharat@gmail.comDecember 10, 20250

पिंपरी (pragatbharat.com):- हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू…

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025

बेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक

December 4, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.