पिंपरी (प्रतिनिधी):– आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी रविराज काळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एक सामान्य घरात वाढलेला, संघर्षमय जीवनातून पुढे आलेला आणि आजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेला चेहरा म्हणून रविराज काळे

त्यांच्या या कार्याचा योग्य गौरव करत पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत ही जबाबदारी सोपवली आहे यापूर्वी त्यांनी आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. “पक्षाच्या “ईमानदारी आणि जनसेवा” या तत्वांशी एकनिष्ठ राहून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू. तसेच, हे फक्त पद नाही, तर माझ्यासाठी जबाबदारी आहे. सामान्य जनतेचा आवाज बनण्याची ही संधी मला मिळाली आहे आणि मी माझ्या सर्व शक्तीनिशी शहरातील प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी झटणार आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया… *पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आप’ सक्षम पर्याय म्हणून उभा राहील – रविराज काळे.आगामी काळात होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला सक्षम आणि पारदर्शक पर्याय म्हणून उभं करण्याचा त्यांचा कटाक्ष आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना वाव देणे, स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे लढणे आणि प्रशासनाला उत्तरदायी बनवणे, या अजेंड्यावर पक्ष शहरात काम करेल. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडमध्ये नव्या उमेदीने आणि नव्या ऊर्जा घेऊन काम करणार आहे. पक्षाचे विचार आणि ध्येय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न शहर पातळीवर अधिक प्रभावीपणे करणार आहे, असे रविराज काळे यांनी म्हटले आहे.