Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे..
पिंपरी चिंचवड

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे..

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comJanuary 7, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
  • मोठी घोषणा ; प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार ”प्रॉपर्टी कार्ड”..
  • निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..

पिंपरी-चिंचवड (दि. ०7 जानेवारी २०२६):- पिंपरी चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे ( प्रॉपर्टी कार्ड) महापालिका निवडणुकीनंतर वाटप करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले. याशिवाय शहरातील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग केले जाणार आहे. प्रत्येक प्लॉटवरील प्रत्येक घराचा सरकारी नकाशा गुगल क्लाऊडवर दिला जाणार आहे, ज्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नकाशा दिसणार आहे. पाचशे वर्षानंतरही आपले घर आपल्याला गुगलवर दिसेल. ही सर्व प्रक्रिया मोफत केली जाणार आहे असे देखील बावनकुळे म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग 17, 23 आणि 24 येथील उमेदवारांसाठी वाल्हेकरवाडी आणि थेरगाव येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप उपस्थित होते. दरम्यान सभेसाठी प्रभाग 17 मधील आशा सूर्यवंशी, नामदेव ढोके, पल्लवी वाल्हेकर, सचिन चिंचवडे तर प्रभाग 23 मधील मनीषा प्रमोद पवार, तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे आणि प्रभाग 24 मधील उमेदवार सिद्धेश्वर बारणे, करिष्मा बारणे, गणेश गुजर आणि शालिनी गुजर हे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मी राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा अंमलबजावणी केली . या कायद्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागेमध्ये बांधलेल्या घरांची सरकार दरबारी नोंदणी करणे शक्य झाले. महापालिका निवडणुका झाल्यानंतर आपण आमदार शंकर जगताप यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड करून घेणार आहोत. मी स्वतः या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यासाठी शहरात येणार आहे. याशिवाय आपण येथील घरांचे ड्रोन मॅपिंग देखील करणार आहोत. येथील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक प्लॉटचा सरकारी नकाशा आम्ही गुगल क्लाऊड वर देणार आहोत. ज्या माध्यमातून गुगलवर नाव टाकल्यानंतर घराचा नकाशा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यातून एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज तयार होणार आहे. ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार आहे. सरकार विशेष बाब म्हणून या सर्व घरांचे ड्रोन मॅपिंग करून नागरिकांना मोफत प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. त्यामुळे यापुढील काळात तहसीलदाराकडे चकरा मारावे लागणार नाही. याचा लाखो परिवाराला दिलासा मिळणार आहे. हे निर्णय होण्यासाठी येत्या 15 जानेवारी रोजी भाजपला आपले मतदान महत्त्वाचे आहे. असे देखील बावनकुळे म्हणाले.

यावेळी निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी 2017 पासून शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीचा आलेख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडला. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रगतीच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ”विकासाचे व्हिजन” साध्य करायचे आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना 15 जानेवारी रोजी मतांच्या रूपाने पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले

बचत गटांना मिळणार लाखाचे अनुदान..नागपूरमध्ये जशी महिला बचत गटांना अनुदान योजना उपलब्ध करून दिली गेली. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले. निवडून आल्यावर शहरातील महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये अनुदान प्रदान केले जाईल.मुख्य म्हणजे लाडकी बहीण योजना भाजपचे सरकार असेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिवडणूक शांततेत व सुरळित पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे..
Next Article प्रतिभा महाविद्यालयात १८५ जणानी रक्तदान केले तर २४५ जणांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

”अजितदादांच्या अकाली जाण्याने लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं”.. दुःखात आम्ही सहभागी आहोत– आ. महेश लांडगे…

January 28, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.