Gold Price Today 28 May 2026: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! सराफा बाजारात उलटफेर, जाणून घ्या मुंबई-दिल्लीसह प्रमुख शहरांतील १० ग्रॅमचा भाव | Gold Silver Rate Today Maharashtra

मुंबई (pragatbharat.com) : जागतिक स्तरावरील भू-राजकीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर झाला आहे. आज, २८ मे २०२६ रोजी सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली असून ग्राहकांसाठी ही एक मोठी ‘गुड न्यूज’ ठरली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव तसेच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून डॉलरला वाढलेली मागणी, यामुळे सोन्याच्या किमती सुळ्ळकन खाली आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४,४६१.०२ डॉलर्स इतका खाली आला आहे. याचा परिणाम म्हणून देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५८,४३० रुपयांपर्यंत घसरला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,२८० रुपये इतका नोंदवला गेला आहे. अवघ्या एका दिवसापूर्वी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल ११०० रुपयांनी घसरून १,६१,३०० रुपयांवर आला होता, त्यात आज आणखी घट झाली आहे.

चांदीच्या किमतीतही मोठी घसरण सोन्यापाठोपाठ चांदीनेही ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आज सकाळी सराफा बाजारात चांदीचा भाव २,८४,९०० रुपये प्रति किलोग्राम नोंदवला गेला. आदल्या दिवशी दिल्ली बाजारात चांदी तब्बल ३३०० रुपयांनी घसरली होती. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी २०२६ मध्ये भारतीय बाजारात चांदीने ४ लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता; मात्र आता हे दर लक्षणीयरीत्या खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदी सध्या प्रति औंस ७४.९६ डॉलरवर व्यापार करत आहे.

का घसरले सोन्या-चांदीचे दर? बाजार तज्ज्ञांच्या मते, दक्षिण इराणमध्ये अमेरिकेने केलेल्या नव्या लष्करी हल्ल्यांनंतर जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. अमेरिका-इराणमधील वाटाघाटींवर अनिश्चिततेचे सावट असल्याने जागतिक व्यापारात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई दीर्घकाळ वाढती राहू शकते, या भीतीने अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ आपले व्याजदर कडक ठेवण्याची शक्यता आहे. हा बदल सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी नकारात्मक ठरल्याने किमतीत घसरण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *