Gold Price Today 30 May 2026: सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा भडका! मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील आजचे विक्रमी दर पहा

मुंबई (pragatbharat.com) : लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि परदेशी बाजारपेठेतील मजबूत स्थितीमुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा कडाडल्या आहेत. आज ३० मे २०२६ रोजी सकाळी सोन्याची घसरण थांबून किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता कमालीची वाढली आहे.

भाववाढीची मुख्य कारणे: जागतिक पातळीवर अमेरिका आणि इराण यांच्यात लवकरच एक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भू-राजकीय घडामोडींसह परदेशी बाजारांमधील वाढत्या किमती आणि लग्नसराईच्या काळात भारतात वाढलेली सोन्याची मागणी यांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरांना मोठी चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४,५३०.७२ डॉलर वर पोहोचला असून, चांदीचा आंतरराष्ट्रीय स्पॉट भाव ७५.५२ डॉलर प्रति औंस झाला आहे.

तुमच्या शहरातील १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर: देशातील प्रमुख शहरांमध्ये आज २४ कॅरेट (शुद्ध सोने) आणि २२ कॅरेट दागिन्यांच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • मुंबई, पुणे आणि कोलकाता: २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५७,६५० रुपये आहे, तर २२ कॅरेटसाठी १,४४,५१0 रुपये मोजावे लागत आहेत.
  • नवी दिल्ली: राजधानीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५७,८०० रुपये तर २२ कॅरेटचा भाव १,४४,६६० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
  • चेन्नई: देशात चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक असून येथे २४ कॅरेटचा भाव १,५९,२९० रुपये आणि २२ कॅरेटचा भाव १,४६,०१० रुपये आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

चांदीच्या दरातही ऐतिहासिक भडका:
सोन्यापाठोपाठ चांदीनेही ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. आज ३० मे रोजी सकाळी चांदीचा भाव तब्बल २,८०,१०० रुपये प्रति किलोग्राम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. आदल्या दिवशीच दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव ५,००० रुपयांनी वाढून २,७४,७०० रुपयांवर बंद झाला होता. देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या बाजारावर होत असून, नजीकच्या काळात या किमती आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *