Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर; कोकण विभागाची बाजी, असा पाहा तुमचा निकाल

पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीचा (SSC) निकाल आज, ८ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता अधिकृतपणे जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने ९७.६२% निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव टाकणे अनिवार्य आहे. यंदाचा निकाल गेल्या वर्षीच्या (१३ मे) तुलनेत लवकर जाहीर झाला आहे.

विभागीय निकालाची टक्केवारी (प्रमुख शहरे):

  • पुणे: ९४.२४%
  • मुंबई: ९४.९७%
  • कोल्हापूर: ९५.४७%
  • नाशिक: ९०.५३%
  • नागपूर: ८९.०७%

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण, लातूर, अमरावती आणि नाशिक या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ‘प्रगत भारत’ परिवारातर्फे अभिनंदन! ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, त्यांनी खचून न जाता मंडळाच्या फेरपरीक्षेच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *