Mumbai Heat: “मुंबईची उष्णता तुमची परीक्षा घेते आणि…”; अंधेरीतील चर्चच्या मजेशीर मेसेजची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईत सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून प्रत्येक मुंबईकर या उष्णतेने हैराण झाला आहे. मात्र, याच कडक उन्हाच्या परिस्थितीवर अंधेरीतील एका चर्चने मिश्किल टिप्पणी केली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अंधेरी पूर्व, चकाला येथील ‘होली फॅमिली चर्च’ने (Holy Family Church) आपल्या प्रवेशद्वारावरील बोर्डवर एक अतिशय मजेशीर आणि प्रेरणादायी संदेश लिहिला आहे.

या बोर्डवर लिहिले आहे की, “काही दिवस तुमची परीक्षा घेतात, काही दिवस तुम्हाला घडवतात, पण मुंबईची उष्णता हे दोन्ही एकाच वेळी करते!” (Some Days Test You, Some Days Build You, Mumbai Heat Does Both). इतकेच नाही तर चर्चच्या अधिकृत यूथ पेजवर हा फोटो शेअर करताना “तुमच्या मित्रांना रोस्ट करू नका, कारण मुंबईची उष्णता त्यांना आधीच रोस्ट करत आहे,” असे कॅप्शन दिले आहे, जे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

हे चर्च अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि थेट काळजाला भिडणाऱ्या संदेशांसाठी प्रसिद्ध आहे. याआधीही त्यांनी “देवाने तुम्हाला बनवले आहे, म्हणजे तो नक्कीच क्रिएटिव्ह आहे” आणि “कमी स्क्रोल करा, जास्त जगा” असे संदेश देऊन लोकांचे लक्ष वेधले होते. कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या मुंबईकरांच्या चेहऱ्यावर या फलकांमुळे एक छोटेसे हसू येत असून, सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *