[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
iPhone 15 Price : नव्याने लॉंच झालेल्या iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max साठी भारतीयांना सुमारे 2 लाख रुपये मोजावे लागतील, जाणून घ्या iPhone सीरीजची संपूर्ण माहिती आणि किंमतीबाबत
आयफोन 15 सीरीजबाबत दोन गोष्टी पहिल्यांदाच घडत आहे
Apple ने आपली iPhone 15 सीरीज जागतिक बाजारात लॉंच केली आहे. कंपनीने आपल्या लॉंच इव्हेंटमध्ये 4 नवीन iPhones iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लॉंच केले आहेत. आयफोन 15 सीरीजबाबत अशा दोन गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. पहिली म्हणजे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये नॅनोमीटर प्रोसेसर A17 Pro, टायटॅनियम बॉडी आणि 4K60 FPS इमेज फीचर आहे. दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे iPhone 15 भारतातील 2 लाख रुपयांच्या किंमतीवरून केवळ 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
iPhone 15 मालिकेची किंमत
भारतात iPhone 15 Pro Max च्या 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपये असेल, जी 2 लाख रुपयांपेक्षा फक्त 100 रुपये कमी आहे. तर भारतात iPhone 15 Pro आणि iPhone Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,59,900 रुपये असेल आणि ती 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल.
iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची वैशिष्ट्ये
Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या iPhone 15 मालिकेतील टॉप-एंड आवृत्त्या आहेत. हे दोन्ही हँडसेट Apple च्या नव्या चिपसेट A17 Pro वर चालतात, ज्यात बायोनिक ब्रँडिंग आहे. A17 चिपसेट Apple चा नवीन नॅनोमीटर प्रोडक्शन प्रोसेसर आहे. तर iPhone 15 मालिकेतील iPhone 15 आणि iPhone 15 Plus 5 रंग पर्यायांमध्ये काळा, गुलाबी, हिरवा, निळा आणि पिवळा उपलब्ध आहे, तर अॅल्युमिनियम फ्रेम आणि फ्रॉस्टेड बॅक ग्लाससह हे फोन लॉंच करण्यात आले आहे. आयफोन 15 सीरीजचे टॉप मॉडेल, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स टायटॅनियम आणि स्टेनलेस स्टील फ्रेमसह लॉंच करण्यात आळे आहेत. हे दोन्ही फोन 6.1 इंच आणि 6.7 इंच स्क्रीन आकारात काळ्या, राखाडी आणि पांढर्या रंगाच्या पर्यायांमध्ये लॉंच करण्यात आले आहेत.
iPhone 15 सीरीजचा कॅमेरा
iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध असेल, जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो कस्टमाईझ्ड कॅमेरा अनुभव देईल. तसेच, तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल.
संबंधित बातम्या
iPhone 15 साठी प्री-ऑर्डर कधीपासून? भारतात कधी उपलब्ध होणार? कसं बुक कराल? जाणून घ्या
[ad_2]