Starlink launch in India Speed price how it works All you need to know elon musk will enter into indian market with starlink internet license can be issued soon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Elon Musk in India : आता जिओ (Jio) आणि एअरटेलला (Airtel) टक्कर देणारी इंटरनेट सेवा (Internet Service) लवकरच भारतात येणार आहे. स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिस (Starlink Internet Service) जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांची लवकरच भारतात एन्ट्री होणार आहे. एलॉन मस्क भारतीय बाजारात (Indian Market) उतरणार असून थेट जियो आणि एअरटेलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या इंटरनेट कंपनीला लवकरच भारत सरकारकडून परवाना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे दुर्गम भागात जलद इंटरनेट वापरणे सोपं होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एलॉन मस्क आता इंटरनेट सुविधा देत जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. 

जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार स्टारलिंक

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्थापन केलेली उपग्रह इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (Satellite Internet Service Provider) स्टारलिंक (Starlink) कंपनीचा भारतात येण्याचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या स्टारलिक कंपनीला भारतात काम सुरू करण्यासाठी लवकरच परवाना मिळेल आहे. भारत सरकारकडून स्टारलिंक कंपनीला अपेक्षित मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे. स्टारलिंक कंपनीला परवानगी मिळणं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे शेअर होल्डिंग संरचना स्पष्ट करण्यावर अवलंबून आहे. शेअर होल्डिंग रचना स्पष्ट केल्यानंतर, दूरसंचार विभागाने (DoT) Starlink ला परवानगी पत्र जारी करणं अपेक्षित आहे.

स्पेस सेंटरची अतिरिक्त मंजुरी आवश्यक

स्टारलिंकने 2022 मध्ये सबमिट केलेल्या अर्जानुसार, उपग्रह सेवा (GMPCS) परवान्याद्वारे जागतिक मोबाइल वैयक्तिक संपर्कासाठी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर जिओ (Jio) सॅटेलाइट कम्युनिकेशन्स आणि OneWeb सोबत, Starlink तिसरी संस्था बनण्यास तयार आहे. दूरसंचार विभागाकडून (DoT – Department of Telecommunications) यासाठी मंजुरी मिळणं बाकी आहे. स्टारलिंक, वनवेब आणि जिओचा सॅटेलाइट विभाग त्वरीत ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यास सक्षम नाहीत. पृथ्वीवरील अवकाशात स्पेस स्टेशन किंवा सॅटेलाईट वापरासाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरची अतिरिक्त मंजुरी आवश्यक आहे.

अधिक पाहा..

[ad_2]