Pulitzer Prize 2026: भारतीय पत्रकारांनी कोरले जागतिक पत्रकारितेवर नाव! प्रतिष्ठित ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली/न्यूयॉर्क (pragatbharat.com) : पत्रकारिता क्षेत्रातील जगातील सर्वोच्च मानला जाणारा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) यंदा भारतीय पत्रकारांनी पटकावला आहे. भारतातील सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश करणाऱ्या एका विशेष कला वार्तांकन प्रकल्पासाठी (Art Reporting Project) आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ब्लूमबर्गसाठी तयार केलेल्या ‘इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कमेंटरी’ श्रेणीमध्ये नताली ओबिको पिअरसन यांच्यासह या भारतीय पत्रकारांनी हा बहुमान मिळवला. याव्यतिरिक्त, हनोई येथे कार्यरत असलेले भारतीय पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांनी ‘इंटरनॅशनल रिपोर्टिंग’ श्रेणीमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे. त्यांनी अमेरिकेच्या सीमा सुरक्षा दलाद्वारे (Border Patrol) केल्या जाणाऱ्या सामूहिक पाळत ठेवण्याच्या (Mass-surveillance) छुप्या साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर उघडकीस आणला होता.

कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नलिझमद्वारे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. भारतीय पत्रकारांनी जागतिक व्यासपीठावर मिळवलेल्या या यशामुळे भारताच्या शोध पत्रकारितेचे (Investigative Journalism) सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *