‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून जवानांना सलाम; दहशतवाद मुळापासून उखडण्याचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (pragatbharat.com) : “दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणारी यंत्रणा मुळापासून उखडून टाकण्यासाठी भारत आपल्या संकल्पावर ठाम आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक केले.

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर: पंतप्रधान म्हणाले की, पहलग्राम येथे निष्पाप भारतीयांवर हल्ला करणाऱ्या नराधमांना भारतीय लष्कराने अत्यंत धाडसाने आणि अचूकतेने चोख प्रत्युत्तर दिले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेल्या अतूट वचनबद्धतेचे आणि दहशतवादाविरोधातील कडक भूमिकेचे जिवंत उदाहरण आहे. संपूर्ण देश आज आपल्या जवानांच्या पराक्रमाला सलाम करत आहे.

आत्मनिर्भरतेचे बळ: या मोहिमेने भारतीय लष्कराची व्यावसायिकता, सज्जता आणि तिन्ही दलांमधील समन्वय (Jointness) जगासमोर आणला आहे. संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला कशी नवी ताकद देत आहे, हे या ऑपरेशनमधून सिद्ध झाले आहे, असेही मोदींनी नमूद केले.

संस्कृत सुभाषित आणि गौरव: आपल्या संदेशात पंतप्रवानांनी एका संस्कृत सुभाषिताचा उल्लेख करत म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’मधील हा असाधारण विजय म्हणजे भारतीय सैनिकांच्या राष्ट्रभक्तीचे आणि शौर्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. या विजयामुळे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याच्या संकल्पाला अधिक बळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *