डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल, पिंपरी व नाना काटे सोशल डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल, पिंपरी व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत ओपीडी सेवा सुरू

पिंपरी, दि.१ ऑगस्ट २०२६ : नागरिकांना दर्जेदार, सुलभ व मोफत आरोग्यसेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच मा. विरोधी पक्षनेते/ नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत ओपीडी सेवा सुरू करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट २०२६ पासून प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची ओपीडी सेवा उपलब्ध राहणार आहे. या ओपीडीमध्ये स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा तसेच सर्वसाधारण आजारांवरील तपासणी व उपचार अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे.

यासोबतच या उपक्रमाअंतर्गत डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल, पिंपरी येथे महिलांच्या प्रसूती व त्यासंदर्भातील आवश्यक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना मोठा दिलासा देणारी ठरणार असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सांगितले.

यावेळी हॉस्पिटलचे डीन व प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ममता नाकाळे, डॉ. नीलिमा धारकर, डॉ. केतन जंगले, डॉ. इंद्रजीत घाडगे, डॉ. संपदा वैद्य, डॉ. आरती जाधव, व्यवस्थापक भूषण कुदळे, युवा नेते श्री उमेश काटे, ह.भ.प. विलास अण्णा काटे, पोपटभाऊ जगताप, राजू टकले, संदीप जगताप, प्रतीक काटे, अतुल माने, उमेश इनामके, सनक्रिस्ट सोसायटीचे चेअरमन विशाल जाधव,सेक्रेटरी मिलिंद माने,खजिनदार मनीष दारक,पदाधिकारी,डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, स्टाफ, नर्सेस तसेच परिसरातील नागरिक व सोसायटी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One attachment  •  Scanned by Gmail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *