“पद्मश्री डॉ. डी वाय पाटील दादा यांचे निधन हा आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिशः माझ्यावर आघात-डॉ. पी. डी. पाटील

(pragatbharat.com)“पद्मश्री डॉ. डी वाय पाटील दादा यांचे निधन हा आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिशः माझ्यावर आघात आहे. डी.वाय. दादांनी शिक्षण हेच आपले जीवनकर्तव्य मानले होते. कै. वसंतदादा पाटील यांनी उच्चशिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांच्या मुलांना मिळाव्या यासाठी ऐंशीच्या दशकात

विनाअनुदानित शिक्षणसंस्था सुरू करण्यात प्रोत्साहन दिले. त्यांच्या हाकेला ‘ओ’ देणाऱ्या प्रमुख शिलेदारांमध्ये डीवाय दादांचा समावेश होता. जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणाऱ्या विषयांचे शिक्षण देण्याच्या सुविधा डॉ डी. वाय. पाटील यांनी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या. आज केवळ भारतात नव्हे तर जगभर आमच्या संस्थांमधून शिकलेले हजारो विद्यार्थी कर्तृत्व गाजवत आहेत. आयुष्यात चांगला शिक्षणतज्ज्ञ म्हणून स्वतःची घडण करण्याचे निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून दादांनी सक्रिय राजकारणाचा मोह टाळला. शिक्षण हे त्यांचा ध्यास होता. त्यांचा अखेरपर्यंतचा या क्षेत्रातला प्रवास भावी पिढ्यांना कदाचित दंतकथा वाटावा असाच आहे. ज्ञानचा समाजपरिवर्तनासाठी उपयोग करण्याची त्यांची प्रेरणा केवळ आमच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे राहील.” 

*डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *