चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा; सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, समितीची मागणी
पिंपरी :(pragatbharatc0m) अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि आरक्षणाचा न्याय्य वाटा सर्व घटकांना मिळावा, या मागणीसाठी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १८ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनआक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने आयोजित या महामोर्चात अनुसूचित जातीतील ५८ जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, मातंग समाजातील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचणे आवश्यक आहे. काही घटकांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनुसार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळणे गरजेचे असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.उपवर्गीकरणाला काही संघटनांकडून विरोध होत असला, तरी आरक्षण काढून घेणे हा त्यामागील उद्देश नाही. आरक्षणाचा लाभ अधिक गरजू आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, हा उपवर्गीकरणाचा हेतू असल्याचे समितीने सांगितले.वाल्मिकी, वडार, मादिगा समाजाचा पाठिंबाआरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या या महामोर्चाला वाल्मिकी समाज, वडार समाज आणि मादिगा समाजानेही पाठिंबा दर्शविला आहे. या समाजांचे नेते व प्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तसेच सामाजिक नेते मारुती पंद्री, ॲड. सुशील मंचरकर आणि भारत विटकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. विविध समाजघटकांच्या पाठिंब्यामुळे महामोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त होत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा-महाराष्ट्र सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील ५८ जातींच्या प्रतिनिधींचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे समितीने सांगितले. तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही महामोर्चात सहभागी होणार आहेत.
चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालय-मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. तेथून मोर्चा निगडीच्या दिशेने रवाना होऊन निगडी तहसील कार्यालयासमोर त्याची सांगता होणार आहे.आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेऊन त्याचा लाभ अनुसूचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे. महामोर्चात अनुसूचित जातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अनिल सौंदडे, ॲड. सुशील मंचरकर (वाल्मिकी समाज ) नेताजी शिंदे, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर (वडार समाज )मारुती पंदरी(मादिगासमाज )मनोज तोरडमल, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, मारुती जाधव, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, सुरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, शहाणे भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, सुरज कांबळे, महादेव आडागळे, योगेश लोंढे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

