पिंपरी (Pragatbharat.com):- दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आणि संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

