पुणे (pragatbharat.com) : पुण्यात गुन्हेगारीने आता टोक गाठले असून, पोलिसांनाच धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. वाकड ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विद्यार्थ्याने कॉन्स्टेबलने पावती न फाडता दंड घेतल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. तपासात असे समोर आले की, आरोपीने केवळ स्वार्थासाठी आणि पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी हे कृत्य केले होते. याप्रकरणी त्याच्या इतर दोन साथीदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुशिक्षित तरुणांचा गुन्हेगारीकडे वळणारा कल पाहून पोलीस प्रशासन आणि पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

