बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांची मंत्रालयात भेट घेतली…

मुंबई (pragatbharat.com) : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया बिल्डिंग काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने १६०१ कोटी रुपयांत विकत घेतली त्या मुळे एअर इंडिया बिल्डिंग मधील ५० कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्याअनुषंगाने शिवसेना सहकार सेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. जगदीश लाड यांनी सर्व कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या जाणून काल मंत्रालयात बांधकाम मंत्री मा.श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली असता बेरोजगार होत असलेल्या कामगारांना पुन्हा त्याचं इमारतीमध्ये काम मिळावं अशी निवेदन देऊन मागणी केली त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांनी आमची व्यथा ऐकून सर्व कामगारांना पूर्ववत ठेवण्याचे आदेश आपल्या सहकाऱ्यांना दिले.
सकारात्मक भूमिका पार पाडली त्या बद्दल मी मा.श्री.शिवेंद्रसिंहराजे साहेबांचा मनापासून आभारी आहे…

श्री. जगदीश लाड
मुंबई अध्यक्ष सहकार सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *