बॉलिवूड चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन; ७६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास, मृत्यूचे कारण आले समोर

मुंबई (pragatbharat.com) : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तार्ने संपूर्ण बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी ४ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पहलाज निहलानी हे गेल्या काही काळापासून यकृताच्या (Liver) गंभीर आजाराने त्रस्त होते. याच आजारपणामुळे त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती आणि त्यांचे अवयव उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये एक यशस्वी आणि वजनदार चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. निर्माता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘आँखें’, ‘शोला और शबनम’, ‘इल्झाम’, ‘अंदाज’ आणि ‘तलाश’ यांसारखे अनेक सुपरहिट आणि अजरामर चित्रपट भारतीय सिनेसृष्टीला दिले.

पहलाज निहलानी हे बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा याच्यासोबतच्या दीर्घ सहवासासाठी आणि मैत्रीसाठी विशेष ओळखले जात होते. गोविंदाच्या सुरुवातीच्या संघर्षमय कारकिर्दीला योग्य आकार देण्यात आणि त्याला लागोपाठ ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन इंडस्ट्रीत ‘सुपरस्टार’ म्हणून प्रस्थापित करण्यात निहलानी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे (CBFC) अध्यक्षपद देखील भूषवले. या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या काही कठोर नियमांमुळे आणि वादग्रस्त निर्णयांमुळे ते देशभरात प्रचंड चर्चेत राहिले होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *