भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन…

पिंपरी दि.२७ मे २०२६ (pragatbharat.com) : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

तसेच नेहरूनगर येथील भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,नगरसदस्य राहूल भोसले, नगरसदस्या सारिका मासुळकर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *