




मुंबई: मानखुर्द एक्साव्हेटर ड्रिलिंग क्रेन दुर्घटनेनंतर पंधरा मिनिटाच्या अंतरासाठी चालकांना पाच ते सहा तास वाहतूक कोंडीत अडकले हे क्रेन मशीन बाजूला करण्यासाठी बुधवारी संपूर्ण रस्त्याच काही तासांसाठी अडवून ठेवल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. पोलिसांनी योग्य नियोजन न केल्याचा त्यांचा फटका नागरिकांना बसला. बऱ्याच ठिकाणी पोलीस सोडून स्थानिकांकडून नियोजन होत असल्याचा आरोप चालकांनी केला.
कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी मानखुर्द परिसरात दोन उड्डाणपूलांची कामे सुरू आहेत रस्त्यांच्या बाजूला पत्रे लावून पिलर उभारण्यासाठी मोठ्या मशीन मार्फत खोदकाम सुरू आहे त्यामुळे या भागात आधीच मोठ्या प्रमाणात कोंडी होत त्यात मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास खोदकाम सुरू असताना रस्त्याच्या मधोमध क्रेन कोसळली यात सायन पनवेल मार्गावरून दुचाकीने पनवेल येथील घरी जात असलेल्या पोलीस हवालदार संतोष चव्हाण (४८) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध गुना नोंदवला असल्याचे समजले जाते. नेहरूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या चव्हाण यांनी पोलीस दलात एकूण 23 वर्षे सेवा केली ते पूर्व प्रादेशिक नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्ती वर होते त्यांना मुलगा व मुलगी आहे. सायन पनवेल मार्गावर क्रेन कोसळल्याने बुधवारी या मार्गासह मानखुर्द चेंबूर परिसरात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन मोठ्या क्रेन आणून 29 एप्रिल च्या सायंकाळी ही अपघातग्रस्त क्रेन हटविण्यात आली. पण वाहतूक कोंडी काय होती.
क्रेन मुळे मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली तर चेंबूर ते मानखुर्द हे बारा ते पंधरा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना पाच ते सहा तास लागले होते.
पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी तासंतास रस्त्यावर अडकून पडले अनेकांच्या गाडीत पिण्याचे पाणी नव्हते प्यायला पाणी नाही मधुमेहाच्या रुग्णांना टॉयलेट बाथरूम नाही उलटे फिरून परत जाता येत नाही अशा विदारक स्थितीत महामुंबई कर अडकले.
मुंबईतून पुणे सातारा सांगली या बेंगलोर कडे मोठ्या संख्येने रोज प्रवासी वाहतूक होत असते त्यांच्यासाठी रोज संध्याकाळी धावणाऱ्या बहुतांश ट्रॅव्हल्स मुंबईतून सुटतात बुधवारी रात्री मानखुर्दसह परिसरात झालेली वाहतूक कोंडीचा फटका या ट्रॅव्हल्स प्रवाशांना देखील बसला. रेन हटवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता वरळी होऊन नवी मुंबईला निघालेले नागरिकांना नेमके कुठून कसे जायचे याबाबत योग्य माहिती मिळत नव्हती तसेच पोलीसही दिसले नसल्याचे सांगितले अनेक अडथळे पार करत रात्री अकरा वाजता नवी मुंबईकडे कसेबसे पोहोचल्याचे सांगितले.


