राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत भोसरीतील ‘दामूशेठ गव्हाणे मित्रमंडळ’ प्रथम..

  • शिव-नृसिंह देखावा ठरला निर्णायक ..
  • सुवर्णयुग मित्र मंडळ द्वितीय तर समस्त गव्हाणे तालीम भोसले मंडळ तृतीय…

न्यूज पीसीएमसी नेटवर्क

पिंपरी चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२६ pragatbharat.com) :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. भोसरीतील कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाच्या ‘शिव-नृसिंह’ या देखाव्याने प्रथम क्रमांक पटकावला.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत पिंपरीतील सुवर्णयुग मित्र मंडळाच्या ‘रायगडावरचा शिवदरबार’ या देखाव्याला द्वितीय क्रमांक मिळाला. भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम भोसले मंडळाच्या ‘डरकाळी वाघाची… शिव सह्याद्रीच्या छाव्याची’ या देखाव्याने तृतीय क्रमांक पटकावला. पिंपळे गुरव येथील छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या ‘महादेव भक्त अघोरी’ या देखाव्याला चौथा क्रमांक आणि ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. आकुर्डीतील काळभोरनगर येथील समता मित्र मंडळाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या देखाव्याला पाचवा क्रमांक मिळाला असून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

याशिवाय समाधान तरुण मंडळ चिंचवड स्टेशन – ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, यशस्वी मित्र मंडळ चिंचवड स्टेशन – ‘शुभमंगल सावधान’, खंडोबा माळ मित्र मंडळ आकुर्डी – ‘संभाजी महाराज माहितीपट’, विनर्स मंडळ लांडेवाडी – ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्यगाथा’, अष्टविनायक मित्र मंडळ भोसरी – ‘चालवली जड भिंती हरली’, खंडोबा मित्र मंडळ भोसरी – ‘भी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय’, नरवीर तानाजी तरुण मंडळ भोसरी – ‘गड आला पण सिंह गेला’, एकता मित्र मंडळ रुपीनगर – ‘संस्कृती विकृती’, नागेश्वर मित्र मंडळ आकुर्डी गावठाण – ‘पावनखिंड’, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल साने चौक – ‘माणसा होशील का तू माणसा’, एकवीरा सेवा संघ वाल्हेकरवाडी – ‘महाराष्ट्राची लोकधारा’, जय गुरु दत्त मित्र मंडळ वाल्हेकरवाडी – ‘छत्रपती संभाजी एक विचार’, सम्राट मित्र मंडळ थेरगाव – ‘स्वराज्याचा छावा’, स्वराज्य प्रतिष्ठान पिंपरी – ‘आपली संस्कृती आपली परंपरा’, ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ काळेवाडी – ‘सायबर सुंदरी फोन आला फ्राड झाला’, श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ थेरगाव – ‘खेळाला जीवाशी सोंगातला शिवाजी’, अनंत पार्क मित्र मंडळ थेरगाव – ‘बाप एक आधारवड’, चिंतामणी मित्र मंडळ चिंचवड – ‘लग्न सोहळा खर्चाचा की विचारांचा’, नवतरुण मित्र मंडळ चिंचवड – ‘मर्द मर्दानी ताराराणी’ आणि विशाल मित्र मंडळ थेरगाव – ‘मरावे परी देहरूपी उरावे’ या देखाव्यांचीही स्पर्धेसाठी नोंद घेण्यात आली.

सात मंडळांना जय गणेश भूषण पुरस्कार…

स्पर्धेअंतर्गत जय गणेश भूषण पुरस्कारासाठी सात मंडळांची निवड करण्यात आली आहे. जय बजरंग तरुण मंडळ, पवळे उड्डाण ब्रिज, निगडी; जय हिंद मित्र मंडळ ट्रस्ट, प्राधिकरण, निगडी; लांडगे लिंबाची तालीम मंडळ, भोसरी गावठाण; पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ, भोसरी; गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवड; एस.के.एफ. मित्र मंडळ, चिंचवड आणि राष्ट्रतेज तरुण मंडळ, काळभोरनगर यांचा यामध्ये समावेश आहे.

या सातही मंडळांना सन्मानचिन्ह देऊन ‘जय गणेश भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवरील देखावे सादर करून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या प्रयत्नांची या स्पर्धेत दखल घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *