
पिंपरी, चिखली (pragatbharat.com) : पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार, जनतेच्या मनातील अढळ स्थान असलेले स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या समाजहिताच्या विचारांना कृतीतून जपण्यासाठी विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन, चिखली यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓️ रविवार, दि. २१ जून २०२६
⏰ सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३०
📍 सावित्रीबाई फुले महापालिका शाळा क्र. १२, अंगणवाडी चौक, मोरेवस्ती, चिखली
स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून चिखली प्रभागातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळेला त्यांचे नाव देण्यास मान्यता मिळाली आहे. नगरसेवक मा. विकासभाऊ साने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे नामकरण साकार झाले असून, अजितदादांची विकासदृष्टी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.
या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदानाचे अमूल्य दान करा आणि एखाद्याला नवजीवन देण्याच्या पुण्यकार्यात आपला हातभार लावा.
प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू
एक थेंब रक्त… अनेकांना जीवनदान! या, रक्तदान करूया आणि स्व. अजितदादांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करूया.
मा. श्री. विकास नामदेव साने
- स्थायी समिती सदस्य, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- संस्थापक/अध्यक्ष, विकास अनाथ आश्रम
- संस्थापक/अध्यक्ष, विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन, चिखली, पिंपरी चिंचवड



