Manipur Violence,Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; ७२ तासांत ८ जणांचा मृत्यू, १८ जखमी – eight people died in manipur violence in 72 hours

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, इम्फाळ : बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यात गेल्या ७२ तासांत कुकी आणि मैतेईंमध्ये झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांचा गेल्या १२ तासांत मृत्यू झाला. ठार झालेल्या आठ जणांमध्ये दोन जवानांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी बिष्णुपूर जिल्ह्यातील खोइरंकटक आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौसाबुंग भागांत दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी खोइरंटक भागात एका ग्रामसेवकाची सकाळी हत्या करण्यात आली. त्यानंतर हिंसाचाराला सुरूवात झाली. बुधवारी संध्याकाळपासून काही तासांच्या शांततेनंतर गोळीबाराची ताजी घटना घडली. तर, बुधवारच्या हिंसाचारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मिझोरममार्गे गुवाहाटी येथे नेत असताना मृत्यू झाला; तसेच हिंसाचारात जखमी झालेल्या अन्य एका व्यक्तीचा गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चुराचांदपूर जिल्ह्यातील रुग्णालयात मृत्यू झाला.

चिंगफेई भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पाचपैकी तिघांना चुराचांदपूरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिष्णुपूरच्या नारायणसेना गावाजवळ मंगळवारी झालेल्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा त्याच्याच देशी बनावटीच्या बंदुकीतून तोंडावर गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, इंडिजिनियस ट्रायबल लीडर्स फोरम या संघटनेने तातडीने चुराचंदपूर बंदची हाक दिली आहे. पाणी आणि वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

‘सुरक्षा दलांनी कांगपोकपी, थौबल, चुराचांदपूर आणि इम्फाळच्या पश्चिम जिल्ह्यांच्या सीमा आणि संवेदनशील भागात शोध मोहीम राबवली. यावेळी पाच शस्त्रे, ३१ काडतुसे, १९ स्फोटके, आयईडी साहित्याची तीन पाकिटे जप्त करण्यात आले,’ असे मणिपूर पोलिसांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे; तसेच पोलिसांनी विविध जिल्ह्यांमध्ये १३० चौक्याही उभारल्या असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १,६४६ जणांना ताब्यात घेतले आहे.
चिमुकल्याच्या कपाळात बंदुकीची गोळी, ४० तास मृत्यूशी झुंज पण…; आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश
मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित केल्यानंतर मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

[ad_2]