Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पुणे»‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार’
पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार’

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comFebruary 21, 2025Updated:February 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे (pragatbharat):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ पुणे येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातील 20 देशांमध्ये साजरा केला जातो. ज्यावेळी भारतातील अनेक मोठे राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांच्यासोबत काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवरायांना मराठी मुलखाला व हिंदुस्थानला स्वतंत्र करायचे आहे, अशी शिकवण दिली.

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करत देव, देश, धर्म व रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली, त्यामुळे लाखोंची फौज घेऊन येणाऱ्या मुघलांनाही केवळ पाच हजार मावळे परास्त करायचे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार आहेत. राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली करांची रचना, शेतकरी हिताची कामे, जल, जंगल संवर्धन, अभेद्य तटबंदी, आरमार, समुद्रकिनाऱ्यांचे व्यवस्थापन, समुद्री सुरक्षा अशी प्रत्येक बाब महाराजांनी आपल्याला शिकविली. सामान्य माणूस, महिलांचे कल्याण, सन्मान यांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. एक मजबूत भारत, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबीव्हीजी चे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांना मातृशोक
Next Article मराठी भाषा अमृताहूनी गोड – पंतप्रधान नरेंद्र मोदी
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका -पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे

January 28, 2026

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्‍या वर्धापन दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे साजरा.

January 7, 2026

रामवाडी मेट्रो स्थानकाजवळ आता एसटीचा थांबा

December 16, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.