Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका : हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंत भोसले
पिंपरी चिंचवड

कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका : हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंत भोसले

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comJune 9, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (Pragatbharat.com):- राज्यातील झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकीकरणामध्ये अनेक वेळा श्रमिक वर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार दुर्लक्षित केला जातो. अशाच अन्यायग्रस्त कामगारांच्या न्यायहक्कासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या कार्यालयात झालेल्या विविध औद्योगिक कंपन्यांवरील बैठकींमध्ये अन्यायग्रस्त श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली.

 

यावेळी यशवंत भोसले म्हणाले की, राज्यभरातील अनेक कंपन्यांमध्ये पर्मनंट नोकऱ्या रद्द करून कंत्राटी, हंगामी स्वरूपात कामगारांना नियुक्त केले जात आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांचे आयुष्य विस्कळीत होत असून, न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे निवेदन सादर करून ही माहिती दिली होती.

 

त्यानंतर त्यांनी तातडीने विविध औद्योगिक आस्थापनांसोबत समेटासाठी बैठका लावल्या. या बैठकीत कामगार आयुक्त, औद्योगिक आरोग्य सुरक्षा अधिकारी, पोलीस अधिकारी, संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कोणत्याही कामगाराला कामावरून काढू नये आणि वेतन द्यावे, असे आदेश दिले होते. मात्र, अनेक खाजगी व सरकारी संस्थांनी आदेश धुडकावून शेकडो कामगारांना कामावरून काढले. त्यामध्ये मे. पोलिबॉण्ड, राठी कंपनी, प्लास्टिक ओमनियम, लोकमान्य हॉस्पिटल, तुळजापूर देवस्थान इत्यादी आस्थापनांचा समावेश आहे.

 

मुंबई उच्च न्यायालय आणि कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही गेल्या पाच वर्षांपासून कंपन्यांकडून आदेशांची अंमलबजावणी न करता वेळकाढूपणा सुरू आहे. टाटा मोटर्स फौंड्री, चिंचवड येथे फॅब्रिकेशन करत असताना पुष्पेंद्र कुमार (वय 26) या युवकाचा मोठ्या जॉबसखाली दबून मृत्यू झाला होता. याबाबत यशवंत भोसले व पत्रकार ब्रिजेश बडगुजर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. उपाध्यक्ष बनसोडे यांनी गंभीर दखल घेतली असून, कंपनीकडून फक्त सहा लाख रुपये दिल्याचा दावा फेटाळत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुढील आर्थिक व शैक्षणिक मदतीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

 

तुळजापूर देवस्थानच्या व्यवस्थापक व प्रांत अधिकाऱ्यांना कामावरून काढलेल्या कामगारांना आठ दिवसांत पुन्हा कामावर घेण्याचे आणि वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ही लढाई आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सक्रिय सहभागामुळे कामगारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. लोकन्याय हॉस्पिटलच्या कामगारांना कामावर घेण्यासाठी लवकरच आदेश काढणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले आहे. शासनस्तरावर पुढील बैठकीसाठी संबंधित कंपन्यांचे निर्णयक्षम अधिकारी व पोलीस, कामगार विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्णय न झाल्यास शासनाकडून थेट आदेश दिले जातील, असे सूतोवाच उपाध्यक्षांनी केले. सरकारने उचललेले पाऊल हे आशावादी असल्याचे मत यशव भोसले यांनी व्यक्त केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा
Next Article राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

”अजितदादांच्या अकाली जाण्याने लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं”.. दुःखात आम्ही सहभागी आहोत– आ. महेश लांडगे…

January 28, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.