Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

*पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’चा भावनिक आरंभ**पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’चा भावनिक आरंभ*

August 3, 2025

रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

August 3, 2025

ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार – माजी खासदार व समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ

July 31, 2025
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»उद्योग - व्यापार»पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा
उद्योग - व्यापार

पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comApril 16, 2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

क्रेडलवाइजच्या पाळण्याचे अमेरिका व भारतात पेटंट; पाळण्याची विक्री, सेवा आता भारतात सुरू

 

पिंपरी,दि. १६ -आधुनिकतेच्या काळात कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक कुटुंबातील लहान बाळांना आजी-आजोबांचा आणि आई-वडिलांचा हवा तेवढा सहवास मिळत नाही. त्यामुळे लहान बाळांच्या संगोपनात अनेक समस्या उद्भवतात. बाळाला पूर्ण वेळ झोप मिळाली तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होते. प्रत्येक पालकांना आपल्या बाळाची उत्तम काळजी घेणे आवश्यक वाटते. परंतु आई-वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात. या समस्या सोडवण्यासाठी क्रेडलवाइज कंपनीने एक अत्याधुनिक, तंत्रज्ञान युक्त, स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे म्हणजेच द. क्रेडलवाइज.
या पाळण्यात ठेवलेले बाळ जागे होऊन हालचाल करू लागले की, त्याची सूचना मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे पालकांना मिळते. बाळ रडण्यापूर्वीच पाळणा हळुवारपणे स्वयंचलित सुरक्षित झोके देण्यास सुरुवात करतो. त्याचे सर्व नियंत्रण दूरवरून मोबाईल द्वारे करता येते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय निर्माण होत नाही. यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या पाळण्याची सुरक्षाविषयक सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे या उत्पादनाला सुरक्षाविषयक अमेरिकेतील जेपीएमए (JPMA-Juvenile Product Manufacturing Association) आणि ग्रीनगार्ड (GREENGUARD) हे प्रमाणपत्र मिळाले आहे.
बाळाच्या हालचाली ओळखून हा स्वयंचलित पाळणा बाळावर देखरेख ठेवतो आणि पालकांना मोबाईल ॲप्लीकेशन द्वारे सुचित करतो. हा पाळणा अचूकतेने, अगदी सूक्ष्म पद्धतीने काम करीत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही आणि पालकांना देखील आपला वेळ वाचवून कामात लक्ष देता येते, तसेच स्वतःची देखील व्यवस्थित झोप घेता येते.
क्रेडलवाइज हे जगातील पहिले एआय स्वयंचलित स्मार्ट क्रीब तंत्रज्ञान आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे अशी माहिती कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक किरण ब्याहटटी यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी क्रेडलवाईजचे उत्पादन व्यवस्थापक माधव आनंद, मनुष्यबळ संसाधन अधिकारी विशाल सातारकर व आशिष बंका, गुणवत्ता व्यवस्थापक ज्ञानेश्वर कोळगे, पुरवठा साखळी प्रमुख अनुप जोशी, वरिष्ठ लॉजिस्टिक प्रबंधक विनित प्रियदर्शी, मयूर मेश्राम, विश्वरंजन सामाल, हरीश आर., वाणी तडकापल्ली आदी उपस्थित होते.
यावेळी किरण ब्याहटटी यांनी सांगितले की, या आत्याधुनिक पाळण्यामुळे बाळांना पूर्ण झोप मिळण्यास व बाळाची व्यवस्थित शारीरिक व बौद्धिक वाढ होण्यास मदत होते. तसेच पालकांना देखील त्यांच्या व्यस्त वेळा सांभाळून बाळावर लक्ष ठेवणे सुलभ होते. हा पाळणा बाळ २४ महिन्याचे होईपर्यंत वापरता येईल.
प्रशासन व्यवस्थापक विशाल सातारकर यांनी सांगितले की, क्रेडलवाइज ची स्थापना राधिका पाटील व भरत पाटील या दांपत्याने केली आहे. राधिका या पिंपरी चिंचवड मधील नामांकित सर्जन डॉ. नितीन गांधी यांची कन्या आहेत. राधिका यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी चिंचवड मध्ये तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथील सीओइपी येथे झाले आहे. त्यांचे पती भरत पाटील हे देखील उच्चशिक्षित आहेत. राधिका आणि भरत या दोघांचे उच्च शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूर येथे झाले आहे.
राधिका आणि भरत पाटील यांनी क्रेडलवाइज ची स्थापना केली आहे. २०१८ मध्ये त्यांना बाळ झाल्यानंतर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक उपाय शोधत असताना अनेक वर्ष प्रयत्न करून त्यांना भेडसावलेल्या समस्येतून या बेबी टेक्नॉलॉजी कंपनीच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली आणि द क्रेडलवाइज ची निर्मिती करण्यात यश आले. या कंपनीच्या उत्कृष्ट तंत्रज्ञान कौशल्याच्या कामात इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरच्या माजी विद्यार्थी, अवॉर्ड मेडिकल स्कूल बोर्ड प्रमाणित स्त्री रोग तज्ञ एम. डी. डॉ. चित्रा अकिलेस्वरन, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील नवजात बालरोग तज्ञ एम. डी. डॉ. अनुप राव यांचा समावेश आहे.
उत्पादन व्यवस्थापक माधव आनंद यांनी सांगितले की, या कंपनीने अमेरिका आणि कॅनडा येथील हजारो कुटुंबांना हे उत्पादन दिले आहे. त्यामुळे अनेक बाळांना २५ दशलक्ष तासांपेक्षा अधिक वेळ छान झोप घेण्यास मदत झाली आहे. आता हा आधुनिक तंत्रज्ञान युक्त पाळणा भारतातील घराघरांमध्ये पोहोचणार आहे. या उत्पादनाला फास्ट कंपनीचे नेक्स्ट बिग थिंग्स इंटेक “स्मार्ट क्रीब” आणि टाईम मॅगझिनचे “बेस्ट इन्वेंशन्स अवॉर्ड” हे पुरस्कार मिळाले आहेत. या पाळण्याचे अमेरिकेत व भारतात पेटंट रजिस्टर झाले आहे. या अत्याधुनिक पाळण्याची अंतिम बांधणी क्रेडलवाइज कंपनी, हिंजवडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे करण्यात येत आहे.
विपणन अधिकारी अनुप जोशी यांनी सांगितले की, एक्स आणि चॅट जीपीटीचे संस्थापक, संशोधक सॅम अल्टमॅन यांनी देखील हा पाळणा खरेदी केला आहे. त्यांनी राधिका आणि भरत पाटील यांचे अभिनंदन करणारा व या संशोधनाला शुभेच्छा देणारा संदेश एक्स वर प्रसारित केला आहे. आता हा पाळणा भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी www.cradlewise.com या वेबसाइटवर संपर्क साधावा किंव्हा रेलीना डिसिल्वा, फोन ९१ ९९१६ ८९ ७५९८, relina@cradlewise.com, www.cradlewise.com
किंव्हा मेघना – फोन – ९१९०३०७१५६८२,
meghana@cradlewise.com
www.cradlewise.com यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्रेडलवाइज कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिखलीत बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात महापालिकेकडून गुन्हा दाखल…
Next Article कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका : हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंत भोसले
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिका व एमआयडीसी यांच्यात संयुक्त बैठक..

March 29, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
व्हिडिओ

*पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’चा भावनिक आरंभ**पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’चा भावनिक आरंभ*

By pragatbharat@gmail.comAugust 3, 20250

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड, २ ऑगस्ट २०२५ – पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी आपल्या मातीची आठवण…

रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

August 3, 2025

ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार – माजी खासदार व समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ

July 31, 2025

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

July 31, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.