
पिंपरी (दि. २७ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम व्यवसायाची जाहीरात करण्यासाठी क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत व इतर परीसरात दोन बाय दोन फुट या साईजचे अंदाजे १०० क्युऑक्स लावले.

हा प्रकार (दि.२२) दुपारी १२.१५ वा चे सुमारास स्पाईन रोड, चेरी चौक, घरकुल, चिखली येथे उघडकीस आला. याप्रकरणी आकाश चिन्ह व परवाना विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आरोपी १) मुकेश पटेल, दिनेश पटेल (पूर्ण नाव माहीत नाही, ऑफिस पत्ता ALTURA) यांच्या विरोधात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
याप्रकरणी चिखली पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध १९९५ चे कलम ०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा घुले पुढील तपास करीत आहेत.