
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- राज्यातील २१ हजार शहरांमधील सुमारे ८५ लाख मिळकत पत्रिकांमधील पाच प्रकारचे फेरफार आता संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार केली आहे.

खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या फेरफारसाठी ऑनलाईनच अर्ज करावे लागणार असून, अर्जावरील प्रत्येक टप्प्यावर कोणती कार्यवाही केली जात आहे, याची माहितीही अर्जदारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
विभागाकडून हे फेरफारही ऑनलाईनच नोंदविले जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारीनिश्चित होणार आहे. येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.
या प्रणालीमुळे नागरिकांचे काम सोपे होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रणालीचे येत्या आठवडाभरात उद्घाटन करण्यात येणार आहे.
– डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक…