Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

December 10, 2025

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»उद्योग - व्यापार»महापालिका व एमआयडीसी यांच्यात संयुक्त बैठक..
उद्योग - व्यापार

महापालिका व एमआयडीसी यांच्यात संयुक्त बैठक..

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comMarch 29, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारितील विविध प्रलंबित विषयांबाबत महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज पार पडली.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, अजय सुर्यवंशी, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, मुकेश कोळप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, विजय भोजने, प्रेरणा सिनकर, दीपक पाटील, महेश बरीदे, महेश कावळे, सतिश वाघमारे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, प्रादेशिक अधिकारी प्रविण अडसूळ, कार्यकारी अभियंता संजय कोतवाड, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक पी. सी. हसरमनी आदी उपस्थित होते.

महापालिकेशी संबंधित असलेल्या एमआयडीसीकडील विविध प्रलंबित विषयांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जातात. यातील काही प्रकल्पांसाठी आवश्यक जागा एमआयडीसीकडून महापालिकेला दिली जाते. त्याठिकाणी विविध प्रकल्प महापालिकेच्या वतीने उभारण्यात येतात. यासाठी जागा हस्तांतरणाबाबत असलेल्या प्रलंबित प्रक्रियेबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच शहरातील काही भागात रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिका एमआयडीसीकडून पाणी घेते. त्या पाण्याचे दर आणि पाणीपुरवठा वाढीबाबत देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय एमआयडीसी भागातील रस्त्यांवर नागरी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसीकडून आवश्यक मंजूरीकरिता असलेल्या प्रलंबित बाबींबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले, त्यामुळे बहुतांशी प्रलंबित विषय मार्गी लागणार आहेत.

महापालिका व एमआयडीसीतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लागण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यकता असल्यास उभय संस्थांमध्ये सामंजस्य करार करून प्रलंबित विषय पुर्णत्वास न्यावेत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत ‘या’ महत्वाच्या प्रकल्पांवर करण्यात आली चर्चा…

· शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रमुख रस्त्यांसाठी एमआयडीसीकडील आवश्यक जागा उपलब्ध करून देणे.

· शहरातील काही भागात महापालिकेच्या वतीने रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी एमआयडीसीकडून पाणी घेतले जाते, त्यात सुसूत्रता आणणे.

· पर्यावरणपूरक औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी सुधारित कचरा व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे.

· नागरी सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एमआयडीसीतील रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे.

· मलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी एमआयडीसीकडील जागा उपलब्ध करून देणे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिका सेवेतून वर्ग १ च्या पाच अधिकाऱ्यांसमवेत २७ जण सेवानिवृत्त…
Next Article शंभर कोटी खर्चुन होणारा अर्बन स्ट्रीट रस्ता निकृष्ट दर्जाचा…आ. अमित गोरखे यांचा आरोप..
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

December 4, 2025

पिंपरी चिंचवडच्या अभियंता महिलेने बनविला जगातील पहिला अत्याधुनिक पाळणा

April 16, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

By pragatbharat@gmail.comDecember 10, 20250

पिंपरी (pragatbharat.com):- हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू…

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025

बेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक

December 4, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.