Odi World Cup 2023 Pcb Wants To Send Psychologist With Pakistan Team In India Babar Azam

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Team ODI World Cup : पाकिस्तान सरकारने अखेर क्रिकेट संघाला वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. मात्र, असं असलं तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची चिंता आहे. या विश्वचषकासाठी पीसीबी पाकिस्तान क्रिकेट संघासोबत फिजिओलॉजिस्ट भारतात पाठणार आहे. त्यासोबतच पाकिस्तानी संघासह मानसोपचारतज्ज्ञ भारतात पाठवण्याचा पीसीबी विचार करत आहे.

पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसंदर्भात मोठी घोषणा केली. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सरकारने पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारत दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात सांगितलं की, ‘खेळ आणि राजकारण यांच्या एकत्र जोडणं गरजेचं नाही, त्यामुळे पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर जाईल.’

खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत पाकिस्तान चिंतेत

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी जवळपास दोन महिने बाकी आहेत. यावेळी 5 ऑक्टोबरपासून  सुरु होणारी एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. दरम्यान, खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत पाकिस्तान चिंतेत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे पाकिस्तानी टीमसोबत मानसोपचारतज्ज्ञही भारतात येऊ शकतात. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात सहभागी होणारे सर्व 10 संघ तयारीला लागले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान ‘महामुकाबला’

तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तानी संघ भारतात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान हा महासंग्राम पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघ फिजिओलॉजिस्टच्याही शोधात आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, 15 ऑक्टोबरला पाकिस्तानचा भारताविरुद्ध मोठा सामना होणार आहे.

पाकिस्तानी टीमसोबत मानसोपचारतज्ज्ञ येण्याची शक्यता

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघासह एक मानसोपचारतज्ज्ञ भारतात पाठवण्याचा विचार करत आहे. यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना दबावाचा सामना करण्यास मदत होईल. पीसीबीचे कार्यकारी अध्यक्ष झका अश्रफ यांच्यासोबत कर्णधार बाबर आझम यांच्या भेटीनंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. बाबर आझम सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये कोलंबो स्ट्रायकर्सकडून खेळत आहे.

खेळाडूंवरील दबाव कमी करण्यासाठी PCB चा प्रयत्न

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विश्वचषकाच्या दबावाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी संघासोबत मानसोपचारतज्ज्ञ पाठवण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात जास्त सामने खेळलेले नाहीत. त्यामुळेच टीमसोबत मानसोपचारतज्ज्ञ पाठवण्याचा विचार सुरू आहे. 

[ad_2]

Related posts