[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 15 दिवस आहे. दरम्यान आज त्यांनी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिला नसल्याचे म्हणू नये. त्यामुळे असेही पंधरा दिवस गेले असून, सरकारला आणखी एक महिन्याचा वेळ देण्यात येत आहे. त्यांनी एक महिन्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मात्र, तीस दिवस संपल्यावर 31 व्या दिवशी राज्यातील एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
[ad_2]