[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले आहे. 8 प्रवासी या अपघात ग्रस्त प्रायव्हेटमधून प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावर बचाव कार्य सुरू आहे.
मुंबई विमानतळावरच लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला असल्याचे समजते. खराब हवामानामुळं विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विमान अपघात होताच विमानतळावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई विमानतळावरुन विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले.
[ad_2]