IND vs BAN LIVE Score Oct 19th ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live Updates Match Highlights Scorecard in marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Bangladesh LIVE Score: एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघ (Team India) ने एकदिवसीय विश्वचषकात (ODI World Cup) आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत (World Cup Points Table) दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक केली असून आता लक्ष्य गुणतालिकेतील अव्वल स्थानावर आहे. त्यासाठी बांगलादेश विरोधातील सामना जिंकणं आवश्यक आहे.

भारत सलग चौथा विजय मिळवणार?

टीम इंडिया खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक 2023 मध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी दिसून येत आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आजचा सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर रंगणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होईल.

फलंदाजीसाठी पोषक की गोलंदाज ठरणार घातक?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. हे मैदान लहान आकाराचं आहे. छोटं मैदान असल्यामुळेही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. या खेळपट्टीवर संपूर्ण सामन्यात धावा करणं खूप सोपं आहे. या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळाल्याने येथे सहज मोठे फटके मारता येतात. याशिवाय ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही योग्य आहे. या मैदानावर आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये संघांनी 8 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात चाहत्यांना मोठी धावसंख्या पाहायला मिळतील. दरम्यान, ही खेळपट्टी यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच वापरली जात आहे.

कशी आहे एमसीए स्टेडियमची खेळपट्टी?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 एकदिवसीय सामन्यांपैकी 4 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 307 आहे. त्याच वेळी, नंतर फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 281 धावा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की एकदिवसीय सामन्यात एकदाही 225 पेक्षा कमी धावा केल्या नाहीत.

[ad_2]

Related posts