Kumar Kushagra Father Said Sourav Ganguly Was Impressed With Kushagra After The Trials Kkr Ipl Delhi Capitals Squad For IPL 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sourav Ganguly On Kumar Kushagra : आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने झारखंडचा खेळाडू कुमार कुशाग्राला 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्ली कॅपिटल्सने या अनकॅप्ड खेळाडूवर मोठा खर्च का केला? दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरभ गांगुली यामागे काम करत होते. सौरभ गांगुली यांनी (Sourav Ganguly On Kumar Kushagra) लिलावापूर्वीच निर्णय घेतला होता की तो कोणत्याही परिस्थितीत कुमार कुशाग्रला आपल्या संघात सामील करायचा. पण झारखंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजासाठी सौरभ गांगुली इतका प्रभावित का झाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

सौरव गांगुली यांनी कुमार कुशाग्रमध्ये धोनीची झलक पाहिली

दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरभ गांगुली यांना कुमार कुशाग्रामध्ये महेंद्रसिंग धोनीची झलक दिसली. फलंदाजीव्यतिरिक्त कुमार कुशाग्राने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या यष्टिरक्षणाने खूप प्रभावित केलं आहे. या कारणास्तव गांगुलीला कोणत्याही किंमतीत कुमार कुशाग्रला दिल्ली कॅपिटल्सचा भाग बनवायचा होता.

कुमार कुशाग्रच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, चाचणीनंतर सौरभ गांगुली खूप प्रभावित झाले होते. त्यावेळी त्याने कुमार कुशाग्रला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंत बोली लावणार असल्याचे सांगितले होते. कुमार कुशाग्रामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची झलक आपल्याला दिसते, असेही ते म्हणाल होते.

कुमार कुशाग्रला ओळख कशी मिळाली? 

कुमार कुशाग्राने रणजी ट्रॉफी 2022 मध्ये नागालँडविरुद्ध 269 चेंडूत 266 धावा केल्या होत्या. पण ज्या तुफानी शैलीत त्याने फलंदाजी केली त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर, देवधर ट्रॉफी 2023 मध्ये, कुमार कुशाग्र सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 58 चेंडूत 68 धावा केल्या. कुमार कुशाग्र मोठे फटके सहज मारू शकतो, असे म्हटले जाते. याशिवाय त्याने अनेक टप्प्यांवर स्वत:ला सिद्ध केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]