Ambhora Cable Stayed Bridge On Border Of Bhandara And Nagpur District Inaugurated Today 40 Feet High Sky Gallery On Bridge Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ambhora Bridge Inauguration: नागपूर : पाच नद्यांचं विहंगम संगम, दाट वनराई आणि टेकडीवर असलेलं महादेवांचं मंदिर चित्रवत भासावं असा निसर्ग आपल्याला भेटतो ते नागपूर (Nagpur News) आणि भंडारा (Bhandara News) जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आंभोरा इथं. विदर्भातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्‍याचा लौकिक आहे. ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या मधोमध वाहणाऱ्या वैनगंगा, कन्हान, आंब, मुरजा आणि कोल्हारी या पाच नद्यांचा संगम आहे. याच नदीच्या विस्तीर्ण पात्रावर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेट च्या ब्रिजची प्रतिकृती उभारली गेली आहे. 

जर्मन टेक्नॉलॉजीनं हा केबल स्टेड ब्रीज तयार केला आहे. या ब्रीजचं आज (13 जानेवारी 2024) लोकार्पण होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अंभोरा ब्रीजच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहे. या पुलावर स्काय गॅलरी तयार करण्यात आली आहे. तसेच, यावर चढण्यासाठी 40 फूट उंचीची लिफ्टही लावण्यात आली आहे. गॅलरीवर उभं राहून नदी पात्र आणि परिसराचं विहंगम दृश्य पाहाता येणार आहे. हा पूल सुरू होत असल्यानं नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सुमारे 25 गावातील नागरिकांना भंडारा जिल्ह्याशी थेट संपर्क करणं शक्य होणार आहे. किंबहुना या भागातील शेतकरी असो किंवा नागरिक यांना भंडारा येथील मार्केटचा आता थेट लाभ घेता येणार आहे. या सोबतच शिक्षण, आरोग्यासंदर्भातील सोयीसुविधांसाठीही हा पूल सोयीचा ठरणार आहे. या पुलामुळं त्यांचं सुमारे 70 ते 80 किलोमीटरचं अंतर कमी होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे. 

नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील अंभोरा ब्रीजची वैशिष्ट्य काय? 

  • पुलाच्या निर्मितीसाठी 176 कोटी रुपये खर्च
  • केबल स्टेड ब्रिज 
  • पुलाची लांबी 705.20 मीटर असून 15.260 मीटर रुंदीचा हा पूल असून त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ आहे. 
  • पुलावर 40 फूट उंचीवर स्काय गॅलरी. 
  • गॅलरीवर चढण्यासाठी 1020 किलो क्षमतेची लिफ्टची व्यवस्था.
  • गॅलरीवर एकाचवेळी 100 व्यक्ती उभे राहून निसर्ग सौंदर्य बघू शकतात.
  • टी अँड टी कंपनीनं ब्रीज चं बांधकाम पूर्ण केलं
  • कोरोना आणि महापुराला सामोरे जावून 4 वर्षात पुलाचं बांधकाम पूर्ण

दरम्यान,े अंभोरा तीर्थक्षेत्र वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा, कोलारी या 5 नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे, मात्र इतकं महत्त्वाचं असूनही हा परिसर गेली अनेक वर्षी दुर्लक्षित होता. त्यातही दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल नसल्यामुळे नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागला. याप्रश्नी अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अभोरा ब्रीजच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. अखेर हा ब्रीजचं काम पूर्ण झालं असून आज या ब्रीजचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात या पुलाचं उद्घाटन होणार होतं, मात्र त्याचं उद्घाटन न झाल्यानं नागरिकांची अडचण होत होती. या पुलावरील वाहतूकही ठप्प झाली होती. त्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हिरवा झेंडा मिळाला. अखेर आज 13 जानेवारीला या पुलाचं उद्घाटन होणार आहे. 

[ad_2]