Shraddha Kapoor Viral Video: पजामा – टी शर्ट आणि विखुरलेले घर; पॉप स्टारच्या गाण्यावर बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर, नेटकरी म्हणाले ‘आधी घर साफ कर’, अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर

मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडची क्युट आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या चित्रपटांइतकीच सोशल मीडियावरील तिच्या हटके आणि मिश्किल पोस्टसाठी ओळखली जाते. नुकताच श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर घरात पजामा आणि टी-शर्ट अशा अत्यंत कॅज्युअल कपड्यांमध्ये आणि केसांचा अंबाडा (बन) बांधून पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या गाण्यावर बेभान होऊन मनसोक्त डान्स करताना दिसत आहे.

“अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला…” श्रद्धाचे रोमँटिक कॅप्शन श्रद्धा कपूरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला असे नाचायला लावेल.” व्हिडिओच्या शेवटी श्रद्धा कॅमेऱ्याकडे पाहून अत्यंत गोड हसताना दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरचा हा बिनधास्त डान्स व्हिडिओ तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी (Rahul Modi) याने शूट केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला राहुलचा आवाजही ऐकू येतो. हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा असून, अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र, दोघांनीही अद्याप आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.

नेटकऱ्यांनी सुनावले, ‘आधी पसारा आवर’; श्रद्धाचे चोख उत्तर श्रद्धाच्या या व्हिडिओवर तिचे चाहते ‘क्वीन’, ‘क्युट पगलू’ अशा कमेंट्स करत असतानाच, काही नेटकऱ्यांचे लक्ष मात्र श्रद्धाच्या मागे असलेल्या घरातील अस्ताव्यस्त वस्तूंवर आणि पसाऱ्यावर गेले. एका नेटकऱ्याने तर चक्क सल्ला दिला की, “घर खूप अस्वच्छ आणि विखुरलेले दिसत आहे. निदान व्हिडिओ ग्रीन स्क्रीनवर तरी करायचा होता किंवा आधी घर आवरून घ्यायला हवे होते.” या युझरला श्रद्धाने अत्यंत मिश्किल आणि सडेतोड उत्तर दिले आहे. श्रद्धाने लिहिले, “डिअर मॉम, कृपया तुमच्या रिअल आयडीवरून कमेंट करा.” अभिनेत्रीच्या या हजरजबाबी उत्तराने सोशल मीडियावर सर्वांचीच मने जिंकली असून तिच्या कमेंटची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *