
छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते, त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांनी सामाजिक न्यायासाठी अपार कार्य केले. त्यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षण, आरक्षण, आणि समतेला प्राधान्य दिलं. त्यांनी सत्यशोधक समाजाशी जवळीक ठेवून, स्त्री-शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणासाठी मोठं योगदान दिलं. ते खऱ्या अर्थाने समाजसुधारक राजे होते!

