बहन मायावतीजी शिवाय केंद्रीय सत्ता हातात घेईल असा एकही दलित नेता देशात नाही – मुकुंद सोनवणे

नांदेड (pragatbharat.com): देशात बहुजन समाज पार्टी संपली तर संविधानही संपणार आहे, आजघडीला बहन मायावतीजी यांच्याशिवाय केंद्रीय सत्ता हातात घेईल असा एकही दलित नेता देशात नाही आणि बहन मायावतीजी प्रधानमंत्री झाल्याशिवाय बहुजन समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा. मुकुंद सोनवणे (छ. संभाजीनगर) यांनी केले.    

          बहुजन समाज पार्टीची जिल्हा समीक्षा बैठक मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता बी.एस.पी. भवन, कावळे कॉम्प्लेक्स, वाय पॉईंट, गणेश नगर रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. मुकुंद सोनवणे हे बोलत होते.

         या समीक्षा बैठकीस मार्गदर्शन करतांना मा. मुकुंदजी सोनवणे (प्रदेश महासचिव) पुढे म्हणाले की, दलित नेते आमदार खासदारकीच्या किंवा मंत्रिपदाच्या एक दोन तुकड्याला विकले जाऊन मनुवादाचे समर्थन करीत आहेत, असे लाचार लोक संविधानाचे संरक्षण करु शकत नाहीत, बहन मायावतीजी हे स्वाभिमानी नेतृत्व असल्याने देशात त्यांचा दबदबा आहे. त्यांच्यामुळे संविधानाला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही. समजा जर बहुजन समाज पार्टी संपली तर संविधानही संपणार आहे, म्हणून बहुजन समाज पार्टी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न करावेत व बहनजीला प्रधानमंत्री करावे.

          याप्रसंगी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (राज्य कार्यकारिणी सदस्य) यांनी एस. आय. आर. निवडणूक प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. आपल्या मतांचे संरक्षण करण्यासाठी आपले खंबीर मतदान प्रतिनिधी प्रत्येक बुथवर तैनात असणे जरुरी आहे, यासाठी बीएलए एक व बीएलए दोन हे फॉर्म जास्तीत जास्त प्रमाणात त्वरित भरुन देण्याचे आवाहन केले.

         मनिषभाऊ कावळे (मराठवाडा झोन प्रभारी) यांनीही यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. रोज सराव केलेल्या तगड्या पैलवानापुढे साधा पैलवान टिकू शकत नाही, त्याप्रमाणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचे असेल तर पूर्ण तयारी, रोज सराव करुन व तगडा आहार घेऊनच उतरावे लागेल, यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या महामानवांच्या विचारांचा आहार घ्यावा आणि जनतेत मिसळण्याचा सराव रोज करावा असे आवाहन मनिषभाऊ कावळे यांनी केले.

         सेक्टर आणि बूथनिहाय बांधणी करुन बहुजन समाज पक्षाची नांदेड जिल्ह्यात सर्वत्र गाव तिथे शाखा स्थापन करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या दिशा निर्देशानुसार कार्य करण्यात येत असल्याची विधानसभा क्षेत्रनिहाय माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांनी यावेळी सादर केली.

           जिल्ह्यातील सर्व विधानसभा पदाधिकारी, विविध आघाडी व सेलचे पदाधिकारी या अत्यंत महत्त्वाच्या समीक्षा बैठकीस उपस्थित होते. सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे यांनी केले. महिला जिल्हाध्यक्षा मायाताई पाटील, महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर यांनीही आपला कार्य अहवाल यावेळी सादर केला.

         जिल्हा प्रभारी सटवा सोनकांबळे, लोकेश कांबळे, जयवंत थोरात, नायगाव विधानसभा अध्यक्ष राजकुमार सोनकांबळे, हदगाव विधानसभा अध्यक्ष साहेबराव नरवाडे, लोहा विधानसभा अध्यक्ष साईनाथ निळकंठे, किनवट विधानसभा अध्यक्ष भीमराव पाटील, नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष जयकुमार पंडित आणि उत्तर विधानसभा अध्यक्ष नागसेन खंदारे यांनीही आपल्या मतदार संघातील कार्याची सविस्तर माहिती सादर केली.

           इंजि. सुभाष भोकरे, जिल्हाध्यक्ष, बहुजन समाज पक्ष, नांदेड यांचा वाढदिवस यावेळी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम इंगोले मामा, नायगाव विधानसभा प्रभारी मनोहर डुमणे, हदगाव विधानसभा प्रभारी प्रा. विजयकुमार भरणे तसेच ॲड. जे. पी. सोमवंशी, नारायण घुले, मुंजाजी गायकवाड, सतीष पाटील, वाठोरे आर. व्ही., शिवराज कांबळे, जय कुंटे, राजाराम खंदारे, भीमराव सातोरे, अविनाश इटकापल्ले, रमेश लोणे, शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *