दीपज्योती मालिकेत येणार रंजक वळण: ज्योती घेणार स्वराजची ‘वर चाचणी’; दीपचं वेशांतर पाहून प्रेक्षक थक्क

मुंबई (pragatbharat.com) : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘दीपज्योती’ सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या मालिकेत आता हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार असून, कथानकातील एका मोठ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नात्यांची नवी परीक्षा आणि संघर्षाची ठिणगी आगामी भागात उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दीपचे वेशांतर आणि नात्यात तणाव: मालिकेच्या आगामी भागात एक वेगळाच थरार पाहायला मिळेल. ज्योतीचे रक्षण करण्यासाठी दीप चक्क वेशांतर करून समोर येणार आहे. मात्र, दीपाचा हा अवतार ज्योतीला सुरक्षिततेऐवजी बेजबाबदारपणाचा वाटणार आहे. यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडणार असून, त्यांच्यातील अनोख्या नात्यात तणाव निर्माण होणार आहे.

स्वराज आणि प्रीतीची ‘वर-वधू’ चाचणी: दुसरीकडे, स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच कथानकात नवा पेच निर्माण झाला आहे. ज्योती आता स्वराजची ‘वर चाचणी’ घेणार आहे, तर सुलू आत्या प्रीतीची ‘वधू चाचणी’ घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या चाचण्यांमध्ये नेमके काय घडणार आणि त्यातून लग्नाचा मार्ग सुकर होणार की अधिक गुंतागुंतीचा, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व तणावपूर्ण वातावरणातच साखरपुड्याची बोलणी सुरू होणार आहेत.

नात्यांची गुंफण: ‘दीपज्योती’ ही मालिका मुळातच बहीण-भावांच्या प्रेमळ नात्यावर आधारित आहे. ज्योती आणि तिच्या भावंडांचा प्रवास, तर दुसरीकडे पुरुषोत्तम यांच्या कुटुंबातील स्वराज, दीप आणि विराज यांची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. प्रसाद जवादे, पूर्वा कौशिक, डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता झी मराठीवर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *