
नवी दिल्ली/कोलकाता (pragatbharat.com) : पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या कथित विधानावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ममता बॅनर्जींचे हे पाऊल म्हणजे लोकशाही आणि संविधानावर केलेला थेट हल्ला असल्याची टीका भाजपने केली आहे.
भाजपचा घणाघाती आरोप: भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ममता बॅनर्जींच्या या भूमिकेला ‘अराजकतावादी’ म्हटले आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “भारत हा लोकशाही प्रधान देश असून सत्तेचे हस्तांतरण नेहमीच शांततापूर्ण मार्गाने झाले आहे. अशा प्रकारे राजीनामा नाकारणे हे केवळ भाजपवरचे संकट नाही, तर ते देशाच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.” त्यांनी ममता बॅनर्जींना या संदर्भात संयम राखण्याचे आवाहनही केले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांची टीका: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. “ममता बॅनर्जी केवळ जनतेचा कौल नाकारत नाहीत, तर निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांसारख्या घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. लोकशाहीच्या स्तंभांना कमकुवत करण्याचे काम बंगालमध्ये सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पश्चिम बंगालमधील या अभूतपूर्व पेचप्रसंगामुळे देशाचे लक्ष आता राज्यपालांच्या भूमिकेकडे लागले आहे.

