‘सतत परिवर्तन, परिवर्तन काय लावलय?’; अफगाणिस्तानवरील मोठ्या विजयानंतरही सुनील गावस्करांनी हेड कोच गंभीरला सुनावले!

चंदीगड (pragatbharat.com) : भारतीय क्रिकेट संघाने चंदीगड येथे खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानवर एक डाव आणि ३०० धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. मात्र, या मोठ्या विजयानंतरही भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या कामगिरीचे अतिलाड न करता संघाला वास्तवाची जाणीव करून दिली आहे. मुख्य प्रशिक्षक (Head Coach) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) यांच्याकडून सतत वापरल्या जाणाऱ्या ‘संघातील परिवर्तन’ (Transition Phase) या शब्दावर गावस्करांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे.

परिवर्तन विसरा, परफॉर्मन्सवर लक्ष द्या – गावस्कर: जिओ हॉटस्टारशी बोलताना सुनील गावस्कर अत्यंत रोखठोकपणे म्हणाले, “प्रत्येक संघात खेळाडू निवृत्त होत असतात आणि वैयक्तिक बदल घडत असतात. त्यामुळे टीम आता ‘परिवर्तनाच्या’ अवस्थेत आहे हे सतत सांगणे आता बंद केले पाहिजे. भारताचे सर्व लक्ष हे परिवर्तनापेक्षा कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या कामगिरीवर (Performance) असायला हवे.” गंभीरच्या कार्यकाळात मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या कसोटी पराभवांची आठवण करून देत गावस्करांनी संघ व्यवस्थापनाला थेट सुनावले.

टी-२० च्या मानसिकतेवरून फलंदाजांना इशारा: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ८ बाद ५६४ धावांचा डोंगर उभारला, ज्यामध्ये कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी शतके, तर ऋषभ पंत, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतके झळकावली. मात्र, गावस्करांनी फलंदाजांच्या तंत्रावर बोट ठेवले आहे. “भारताची खरी चिंता गोलंदाजी नसून फलंदाजी आहे. काही चेंडू निर्धाव (Dot Balls) गेल्यानंतर फलंदाज संयम गमावतात आणि कसोटीतही टी-२० च्या मानसिकतेने खेळू लागतात. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी वेगळा दृष्टिकोन, शिस्त आणि उत्तम तंत्राची गरज असते. प्रत्येक पराभवाचे खापर ‘परिवर्तनावर’ फोडण्यापेक्षा फलंदाजांनी वर्तमानातील कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे,” असा मोलाचा सल्ला गावस्करांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *