Ahilyabai Holkar Birth Anniversary: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना वाहिली आदरांजली; सुशासनाचे आदर्श मॉडेल असल्याचे केले नमूद

पुणे (pragatbharat.com) : लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना कोटी कोटी अभिवादन करत आदरांजली वाहिली आहे. अहिल्याबाई होळकर यांची बुद्धिमत्ता, करुणा आणि लोककल्याणासाठी असलेले त्यांचे अतूट समर्पण यासाठी संपूर्ण देश त्यांना सदैव आदराने आणि सन्मानाने स्मरणात ठेवेल, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.

सुशासनाचे आणि देशप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक: सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन हे सुशासन (Good Governance), प्रखर राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाचे एक अनुकरणीय मॉडेल आहे.” अहिल्याबाईंनी नेहमीच अत्यंत धैर्याने आणि कर्तव्याच्या भावनेने समाजाचे नेतृत्व केले, असेही त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक चेतना जागृत करण्यात अतुलनीय योगदान: पंतप्रधानांनी अहिल्याबाई होळकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, देशभरातील पवित्र मंदिरे आणि प्रमुख तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करण्यापासून ते समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि कल्याण मिळवून देण्यापर्यंत अहिल्याबाईंचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी भारताची सांस्कृतिक चेतना अधिक बळकट करण्याचे महान कार्य केले. समाजकारण, संस्कृती आणि राष्ट्रउभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान देशाच्या प्रत्येक पिढीला सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *