daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 26 September 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 26 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी कोणत्याही वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या कमतरतेमुळं तुम्ही थोडे उदास दिसाल. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे मिळतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थितीमुळे तुम्ही सर्व खर्च सहजतेने पूर्ण करू शकाल. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ खूप खूश होतील. छोट्या व्यावसायिकांनाही त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी विरोधक तुमच्यासमोर आव्हान उभे करु शकतात. व्यवसायात फसवणूक होऊ नये म्हणून सावध राहा.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक जीवनात अडथळे येतील.आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी अजिबात तणाव घेऊ नका. प्रिय व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय शहाणपणाने घ्या.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन प्रसन्न राहील.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अडकलेले काम पूर्ण होईल, तसेच तुम्हाला धनलाभ होईल.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी राजकारणात अडकू शकता. वैयक्तिक जीवनात काही बदल होऊ शकतात.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी कामात यश मिळेल आणि नवीन कामांची रूपरेषा ठरेल. वैवाहिक जीवनात सुखद परिस्थिती निर्माण होईल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )