मनाची तयारी ठेवा, टीम इंडियाला पुन्हा उपविजेतेपद; ओव्हल मैदानावर पहिल्याच दिवशी पाहा काय झालं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: द ओव्हल मैदानावर काल (बुधवारी ७ जून)पासून सुरू झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी धमाकेदार सुरुवात केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय आता अंगलट आल्याचे चित्र दिसत आहे.

फायनल मॅचमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकला आणि सर्व भारतीय चाहत्यांना मोठा आनंद झाला. रोहितने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने देखील टॉस जिंकला असता तर गोलंदाजीच केली असती असे म्हटले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाली आणि भारताने ७६ धावांवर आघाडीच्या तिघा फलंदाजांना माघारी पाठवले. भारत मॅचवर पकड मिळवणार असे वाटत असताना, स्मिथ आणि हेड यांची जोडी मैदानावर अँकर टाकून थांबली. या दोघांनी फक्त मैदानावर जम बसवला नाही तर भारतीय गोलंदाजांची धुलाई करत धावा केल्या.

WTC Final: स्मिथ-हेड यांनी दिला डोक्याला ताप; आज या ४ गोष्टी केल्या तर ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडेल
हेडने कसोटीत वनडे स्टाईलने फलंदाजी केली. त्याने १५६ चेंडूत १४६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया बाहेरचे हे त्याचे पहिले शतक ठरले. तर WTC चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कसोटी करिअरमधील हेडचे हे सहावे शतक आहे. याआधी त्याने केलेल्या ५ षटकाच्या वेळी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे.

ट्रेव्हिस हेडने फेब्रुवारी २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. तेव्हा त्याने १६१ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी ३६६ धावांनी जिंकली होती. हेडचे दुसरे शतक डिसेंबर २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होते. तेव्हा त्याने ११४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने मॅच २४७ धावांनी जिंकली. त्याचे तिसरे शतक (१५२ धावा) इंग्लंडविरुद्ध होते. ही लढत ऑस्ट्रेलियाने ९ विकेटनी जिंकली. चौथे शतक हेडने इंग्लंडविरुद्ध २०२२ मध्ये केले होते. या लढतीत हेडने १०१ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने मॅच ४१९ धावांनी जिंकली. तर त्याचे पाचवे शतक वेस्ट इंडिजविरुद्ध होते, या मॅचमध्ये त्याने १७५ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने मॅच ४१९ धावांनी जिंकली.

WTC Final Ind v Aus: IPLमधील अपमानाचा ट्रेविस हेडने असा घेतला बदला; भारतीय गोलंदाज हतबल
आता हेडने सहावे शतक झळकावले आहे आणि भारतीय चाहत्यांच्या मनात हा प्रश्न पडला आहे की टीम इंडिया हेडचे शतक आणि ऑस्ट्रेलियाचा विजय हा योगायोग मोडून काढणार का? की यावेळी देखील टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts