heart attack treatment, छातीतली सायलेंट कळ अ‍ॅसिडिटी नसून हार्ट अटॅक असू शकते; जाणून घ्या लक्षणं अन् चाचणी… – seventy percent increase in the incidence of heart attacks

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : छातीत दुखणे, कळ येण्यासारख्या दुखण्याकडे अॅसिडीटीचा त्रास म्हणून दुर्लक्ष केले जात होते. आता मात्र हृदयविकारासंदर्भात जागरुकता वाढली आहे. २०२१ आणि २०१२ या वर्षांशी तुलना करता आता पाचपट अधिक जण अशी लक्षणे जाणवताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेत असल्याचे दिसून येत आहे.करोनाकाळानंतर हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये सत्तर टक्के वाढ झाल्याचे वैद्यकीय विश्लेषणातून दिसून आले आहे. यामध्ये ४० ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तीचा समावेश अधिक प्रमाणात आहे. तसेच पुरुषांमध्ये हृदयविकाराची प्रमाण वाढलेले दिसते. प्रत्येक चार भारतीयांपैकी एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. काही तरुण कलाकार वयाच्या चाळीशीमध्ये मरण पावले. करोनासंसर्गानंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे छातीत दुखणे किंवा कळ येण्यासारख्या लक्षणांकडे आता दुर्लक्ष केले जात नाही. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. आपतकालीन औषध विभागाचे संचालक डॉ. संदीप गोरे यांनी, तरुणांमध्ये हृदयविकारासंदर्भात जागरुकता वाढलेली दिसते. छातीमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवताच ते तपासणीसाठी तातडीने येतात, असे सांगितले.

… अशी होते तपासणी

इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) केला जातो. जर ईसीजी सामान्य असेल, तर ‘ट्रोपोनिन आय’ ही रक्ततपासणी केली जाते. दोन ईसीजी आणि दोन ट्रोपोनिन आय नकारात्मक आल्यास आणि क्लिनिकल संभाव्यता स्कोअर कमी आला, तर आम्ही आंतरराष्ट्रीय वेदना मूल्यमापन प्रोटोकॉलनुसार, छातीत दुखण्यामागे हृदयविकार कारणीभूत नसल्याचे निदान होते. ज्या रुग्णांमध्ये या आजाराची पार्श्वभूमी आहे त्यांचा सीटी कोरोनरी अँजिओग्राम घेतला जातो.
ब्रेन ट्यूमरवर पूर्णपणे मात करणं शक्य; जाणून घ्या लक्षणं, चाचण्या अन् उपचार…
तपासणी आवश्यक

तरुणांमध्ये तशा स्वरूपाची काही लक्षणे दिसली तर पुढील आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. डॉ. संदीप गोरे यांनी तरुणांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये लिपिड प्रोफाइल, एचबी १सी या चाचण्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच वर्षातून किमान एकदा तपासणी करायला हवी. तंबाखू तसेच इतर व्यसनांपासून दूर राहणेही गरजेचे असल्याचे सांगितले.

[ad_2]

Related posts