जोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन. 

पिंपरी, पुणे, जून 2024:(pragatbharat.com) जगातील सुप्रसिद्ध ज्वेलर, जोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन. आपल्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत आकर्षक दागिने पोचवण्याच्या या ब्रँडच्या विस्ताराच्या प्रवासातील हे एक अजून महत्त्वाचे पाऊल आहे.

नवीन शोरूममध्ये अतिशय काळजीपूर्वक घडवलेल्या असंख्य दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. या उद्घाटनाच्या निमित्ताने, सोन्याच्या, हिऱ्यांच्या, चांदीच्या आणि मौल्यवान रत्नांच्या सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सवलत देताना जोयआलुक्कासला अतिशय आनंद होत आहे. ही ऑफर 8 जून ते 10 जून दरम्यान पिंपरीमधील शोरूमला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल!जोयआलुक्कासचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री जोय आलुक्कास या उद्घाटनाच्या निमित्ताने आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले, “पिंपरीमध्ये आमची नवीन शोरूम सुरू करून अधिक मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत आमचे सुप्रसिद्ध कलेक्शन आणि खास सेवा पोचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे उद्घाटन म्हणजे जोयआलुक्कासचा अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि ग्राहकांना दागिने खरेदीचा सर्वोच्च पद्धतींचा आनंद मिळेल, हे सुनिश्चित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आमच्या नवीन शोरूमला भेट देण्यासाठी आणि आमच्या खास उद्घाटनाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वाना आमंत्रित करत आहोत.”

शोरूमचे उद्घाटन श्री कृष्णकुमार गोयल (एमडी, अध्यक्ष-कोहिनूर समूह) आणि  सोनाली कुलकर्णी (सिने अभिनेत्री) यांच्या हस्ते करण्यात आले, ह्या वेळी,  श्री. थॉमस मॅथीव, श्री. हेनरी जॉर्ज, राजेश क्रिशनन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

पिंपरी येथील नवीन शोरूममध्ये गुणवत्ता, आकर्षकता आणि ग्राहकाचे समाधान या गोष्टींसाठी असलेली जोयआलुक्कासची कटीबद्धता दिसून येते.  या भव्य उद्घाटनासह, जोयआलुक्कासने जगभरातील विश्वासार्ह आणि आवडता ज्वेलर असण्याचे आपले स्थान भूषवणे सुरू ठेवले आहे. फक्त 8 जून ते 10 जून दरम्यान वैध असलेल्या उद्घाटनाच्या खास ऑफरचा फायदा घेण्यासाठी जोयआलुक्कासला भेट द्या. जोयआलुक्कासच्या उत्कृष्टतेचा अनुभव घ्या आणि दागिन्यांच्या सर्वोत्तम कलेक्शन्समध्ये हरवून जा.

Related posts