इप्शिता तमुली ने पटकावला NEET 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात 91 वा क्रमांक इप्शिता ने संपादन केले 720 पैकी 715 गुण

पुणे, 5 जून 2024 :- आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या पुणे शाखेची विद्यार्थिनी इप्शिता तमुली हिने NEET 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात 91 वा क्रमांक पटकावून AESL च्या कीर्तीत मोलाची भर घातली आहे. या महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत इप्शिता ने 720 पैकी 715 असे भरघोस गुण संपादन केले आणि आपले परिश्रम आणि निष्ठा यांची पावती मिळविली. राष्ट्रीय चाचणी संस्थेने ( National Testing Agency- NTA) ने काल या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला. इप्शिता ने AESLच्या क्लास रूम तुकडीत नाव नोंदवून जगातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षा मानली जाणा-या NEET ची तयारी केली. तिने आपल्या या यशाचे श्रेय अभ्यासतील विविध संकल्पना समजावून देण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम आणि अभ्यासाचे अत्यंत शिस्तबद्ध वेळापत्रक यांना दिले आहे. ” या दोन्ही बाबतीत आकाश च्या शिक्षक वर्गाने मला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आकाश ने तयार केलेले अभ्यासाचे साहित्य आणि AESL मध्ये मिळालेले मार्गदर्शन नसते तर इतक्या कमी वेळात विविध विषयातील अनेक संकल्पना नीट समजून घेणे मला शक्य नव्हते,,” असे इप्शिता म्हणाली. इप्शिता च्या या घवघवीत यशाबद्दल तिचे अभिनंदन करताना AESL चे अध्यापन प्रमुख आणि व्यवसाय प्रमुख श्री अमित सिंग राठोड म्हणाले, ” आमच्या विद्यार्थिनीने मिळविलेल्या या मोठ्या यशाबद्दल आम्ही तिचे अभिनंदन करतो. तिच्या अथक प्रयत्नांचे आणि निष्ठेचे तसेच तिच्या पालकांनी तिला दिलेल्या भक्कम पाठबळाचे प्रतिबिंब तिच्या यशात दिसते. NEET च्या आमच्या सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही भविष्यातील उत्तम यशासाठी शुभेछा देतो. ” राष्ट्रीय चाचणी मंडळातर्फे दरवर्षी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. सरकारी किंवा खाजगी महाविद्यालयात MBBS, दांतवैद्यक (BDS) तसेच BAMS, BUMS, BHMS अशा विविध वैद्यकीय विद्या शाखांमध्ये शिक्षण घेण्याची इछा असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पात्रता परीक्षा म्हणून द्यावी लागते. परदेशात प्राथमिक वैद्यकीय शिक्षण घेऊ इछिणा-या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा द्यावी लागते.

Related posts